उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, मारहाण , लैंगिक छळ गुन्हे दाखल 

 

 येरमाळा: चालक-आश्रुबा बाळु बारकुल रा. उपळाई ता. कळंब हे 18 एप्रिल रोजी आपली ट्रक उपळाई येथे लावली होती. मध्यरात्री अनिल रामा काळे व ईतर रा. खामकरवाडी हे ट्रकच्या डीझेल टाकीतुन डीझेल चोरले. अशा  मजकुराच्या आश्रुबा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 379, 511, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: अमोल वेदपाठक, रा. पारा ता. वाशी यांच्या घराचे खिडकीचे ग्रील 18 एप्रिल मध्यरात्री अज्ञाताने तोडुन घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम  चोरुन नेले. अशा मजकुराच्या अमोल यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण: सालार आबरार पठाण, रा. ‍शिराढोण यांनी घराबाहेर लावलेली त्यांची  हिरो कंपनीची मो. सा. क्र. एम. एच. 25 यु 3842 ही 14-15 एप्रिल रोजीच्या दरम्यान  अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण 

वाशी: उमेश मसाजी शिंदे, रा. मांडवा हे  18 रोजी 08.30 वाजता घरासमोर होते. यावेळी जुन्या वादातुन गावकरी ईश्वर, सुरज, रतनबाई पवार यांनी उमेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली व काठीने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उमेश शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: संजय संभाजी माने, रा. ताकविकी हे 18 रोजी 19.30 वाजता जि. प. शाळेच्या जवळ होते. यावेळी जुन्या वादातुन गावकरी बालाजी अनुरथ सुर्यवंशी यांनी संजय यांना शिवीगाळ करुन कोणत्यातरी वस्तुने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संजय माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 324,  504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लैंगिक छळ

उस्मानाबाद -  जिल्हयातील एका गावातील एक 30 वर्षीय विवाहित महिला 11 एप्रिल रोजी सायंकाळी गावात असतांना गावातीलच एका तरुणाने तीचा पाठलाग करुन तीचे हातास धरुन गाडीवर बस असे म्हणुन विनयभंग केला. तसेच तीला व तीचे पतीस ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधित महिलेने  18 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 354, 354(अ), 354(ड), 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.