सुनेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल

 

भूम: श्रीमती अमृता अक्षय बोराडे, वय 25 वर्षे, रा. पाथ्रुड, ता. भूम यांनी दि. 18.05.2020 रोजी 15.00 वा. सु. घराशेजारील विहीतील पाण्यात बुडून आत्महत्या केली. व्यवसाय चालू करण्यासाठी माहेराहुन 5,00,000 ₹ आणण्यासाठी सुन- अमृता यांचा सासरकडील- 1)अक्षय बाळासाहेब बोराडे (पती) 2)मिराबाई बोराडे (सासु) 3)बाळासाहेब बोराडे (सासरे), तीघे रा. पाथ्रुड, ता. भूम यांनी वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केल्याने या छळास कंटाळून अमृता यांनी आत्महत्या केली. अशा मजकुराच्या नारायण निवृत्ती जोगदंड, रा. बाभुळगांव (देवी), ता. बीड यांनी दि. 20 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 306, 498 (अ), 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी

 कळंब: भास्कर हरीदास झिरमिरे, रा. हासेगांव, ता. कळंब यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एस 9043 ही दि. 15 मे रोजी 15.45 वा. सु. कळंब येथील ढोकी रस्त्यालगतच्या ‘अमित हॉटेल’ समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या भास्कर झिरमिरे यांनी दि. 20 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ऑनलाईन फसवणूक

 उस्मानाबाद-  नारायण प्रल्हाद व्यास, रा. काकानगर, उस्मानाबाद यांनी त्यांच्या बँक खात्यास एक युपीआय प्रणाली स्वीकारली होती. त्या युपीआय प्रणालीमार्फत व्यास यांच्या खात्यात जमा झालेल्या पैशांचे लघु संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक मिळवून त्या तथाकथीत ग्राहक सेवा केंद्राशी ‍दि. 20 मे रोजी 10.48 वा. सु. संपर्क साधाला असता त्या समोरील व्यक्तीने व्यास यांच्या डेबीट कार्डची माहिती विचारुन घेउन एनीडेक्स नावाचे ॲपलीकेशन इंटरनेटवरुन डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक पाठवली. ते ॲपलीकेश व्यास यांनी डाऊनलोड करुन समोरील व्यक्त्तीने सांगीतल्याप्रमाणे तेथे त्यांनी आपल्या बँक खात्याची व्यक्तीगत माहिती भरली. यावर समोरील व्यक्तीने नारायण व्यास यांच्या बँक खात्यातील 1,12,872 ₹ रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे अन्य खात्यात वळती केली. अशा मजकुराच्या नारायण व्यास यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (क) (ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.