उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगीक अत्याचार,अपहरण, चोरी गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद -  एक 35 वर्षीय विवाहीत महिला  (नाव- गाव गोपनीय) दि. 31 मे रोजी 20.00 वा. सु. शौचास गेली असता गावातीलच एका पुरुषाने तेथे जाउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडला प्रकार अन्य कोणास सांगीतल्यास तीला व तीच्या कुटूंबीयांना ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण

उस्मानाबाद -  एका तरुणाने गावातीलच एका 15 वर्षीय मुलीस फुस लाउन (नाव- गाव गोपनीय) दि. 30.05.2021 रोजी 18.30 वा.सु. तीच्या राहत्या घरुन तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी

 लोहारा: गजानन विठ्ठल पटवारी, रा. तावशीगड, ता. लोहारा यांनी त्यांची हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 9092 ही दि. 03.03.2021 रोजी 21.30 वा. सु. गावातील महादेव मंदीरामागे लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 07.00 वा. सु. ती मो.सा. त्यांना लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गजानन पटवारी यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.