उस्मानाबादेत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैगिक अत्याचार
उस्मानाबाद : परजिल्ह्यातील एका 30 वर्षीय महिलेस (नाव- गाव गोपनीय) उस्मानाबाद जिल्ह्यातील एका पुरुषाने, “मी तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या नावावर पैसे टाकतो व तुला सोने करतो.” असे आमिष मे ते ऑगस्ट 2021 दरम्यान वेळोवेळी दाखवून त्या महिलेस आपल्या गावी आनुन तीच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान महिलेने लग्न करण्याबाबत आग्रह धरला असता “तु कामाला जात नाही.” असे कारण काढून त्या पुरुषाने तीला शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी देउन घरातून हाकलून दिले. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपहरण
उस्मानाबाद : एक 16 वर्षीय मुलीगी (नाव- गाव गोपनीय) दि. 14 ऑगस्ट रोजी 12.30 वा. सु. आपल्या घरात असतांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.