मनाई आदेश झुगारुन आस्थापना चालू , तेरा गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद  - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने जिल्ह्यात जनता कर्फ्यु अंमलात असुन त्या अनुशंघाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश लागू असून त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस दलातर्फे दि. 21 मे रोजी खालील प्रमाणे विविध कायदा- कलमांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1) जब्बारभाई बेग, रा. भुम यांनी भुम येथील आपले मसाल्याचे दुकान व्यवसायास चालू ठेवले तर धर्मराज सातपुते, रा. वाकवड, ता. भूम यांनी 13.30 वा. सु. गावातील आपले किराण दुकान व्यवसायास चालू ठेवले तर कल्याण गलांडे, रा. सुकटा, ता. भुम यांनी 13.30 वा. सु. गावातील आपले ‘तुळजाई पानस्टॉल’ व्यवसायास चालू ठेवले तर याकुब शेख, रा. बावी, ता. भुम यांनी 11.45 वा. सु. बावी येथील आपले ‘चिकन सेंटर’ व्यवसायास चालू ठेवले असतांना भूम पोलीसांना आढळले.

2) चोराखळी, ता. कळंब येथील 1)श्रीराम साठे 2)दत्ता वाघमारे हे दोघे नाका- तोंडास मास्क न लावता कळंब शहरात विनाकारण फिरत असतांना कळंब पोलीसांना आढळले.

3) महेश दुगाने, रा. शिराढोन व सचिन कुलकर्णी, रा. तांदुळजा हे दोघे नाका- तोंडास मास्क न लावता शिराढोन येथे सार्वजनिक ठिकाणी फिरतांना शिराढोन पोलीसांना आढळले.

4) औदुंबर पिंगळे, रा. तुळजापूर हे आपले ‘तुळजाई भेळ सेंटर’ हे दुकान चालू ठेउन व्यवसायास करतांना तर विजय शिंदे, रा. तुळजापूर हे आपले ‘सिध्दी ॲटोमोबाईल्स’ हे दुकान चालू ठेउन व्यवसाय करतांना तुळजापूर पोलीसांना आढळले.

5)पांडुरंग म्हेत्रे व धनंजय नाजरकर, दोघे रा. येडशी हे गावातील आपापले अनुक्रमे ‘बालाजी कलेक्शन’ व ‘अरिहंत कलेक्शन’ ही कापड दुकाने चालू ठेउन व्यवसायास करतांना उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना आढळले.

6)विक्रम गायकवाड, रा. वाशी यांनी वाशी येथील आपले ‘मातोश्री वेल्डींग’ हे दुकान व्यवसायास चालू ठेवले असतांना वाशी पोलीसांना आढळले.