उस्मानाबाद पोलीसांचे गुन्हेगारांविरोधी कोंम्बिंग ऑपरेशन

 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात चोरी, दरोडा असे मालासंबंधी व इतर गुन्हे केलेले अनेक  आरोपी व गुन्हेगार उस्मानाबाद जिल्‌ह्यातील रहिवासी असुन यातील अनेक आरोपी हे उस्मानाबाद तसेच इतर जिल्हा, राज्यांस तपासकामी हवे असतांत. परंतु  त्यांचा निश्चित ठावठिकाणा समजुन येत नसल्याने त्यांना पकडने जिकरीचे असते. अशा आरोपींसोबतच इतर संशयीत व्यक्तींचे इतीवृत्त (र्हिस्ट्रीशीट) पोलीस दलाने उघडलेले असुन या व्यक्तींचा सध्याचा व्यवसाय, वर्तनुक यावर पोलीस लक्ष देउन असल्याने वेळोवेळी त्यांना अचानक भेटून याची खात्री केली जाते.

या पार्श्वभुमीवर  पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनातून काल बुधवार दि. 28 जुलै रोजी 23.00 ते आज दि. 29 जुलै रोजी 06.00 वा. दरम्यान जिल्हाभरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. अशा संशयीतांची यादी स्थानिक गुन्हे शाखे मार्फत संबंधीत पोलीस ठाण्यांत पाठवण्यात आली. या ऑपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी- अंमलदार, गृहरक्षक दल जवान यांना नेमण्यात येउन आपापल्या हद्दीतील आरोपींची घरे, वस्त्या यांना अचानक भेटी देउन संबंधीत संशयीतांची खातरजमा करण्यात आली. हद्दीतील लॉजेस, धाबे, पेट्रोलियम विक्री केंद्रे, एटीएम केंद्रांस अचानक भेटी देण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान पोलीसांनी 33 हिस्ट्रीशीटर व्यक्तींना भेटून  त्यांच्या सध्याच्या वर्तनाची शहानिशा करण्यात आली.