उस्मानाबाद जिल्हा फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
उस्मानाबाद : सहदेव बापु तोडकड, रा. ईराचीवाडी, ता. भुम हे दि. 11 ऑगस्ट रोजी 12.00 वा. सु. दोन मित्रांसह वॅगन-आर गाडी क्र. एम.एच. 14 जीयु 4021 ने आरटीओ कार्यालयाकडे जात होते. दरम्यान मेघदुत हॉटेल समोरील रस्त्यावर संजय एकनाथ राठोड, रा. एमआयडीसी, उस्मानाबाद यांसह अन्य दोन अनोळखी पुरुषांनी सहदेव तोडकड यांची गाडी आडवून, “मी महिंद्रा कंपनीचा प्रतिनीधी असल्याची बतावणी करुन सहदेव यांच्या गाडीची चावी जबरीने घेउन गाडीतील 20,000 ₹ रोख रक्कम व एक स्मार्टफोन घेउन गेले. अशा मजकुराच्या सहदेव तोरकड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 392, 341, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : तांबरी विभाग, उस्मानाबाद येथील गंगाराम लव्हे यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 10.08.2021 रोजी 16.20 वा. एका अज्ञाताचा कॉल आला. ‘पाच पैसा वेबसाईट’ मधून बोलत असल्याची बतावणी करुन त्या अज्ञाताने गंगाराम यांच्या बँक खाते, एटीएम कार्ड, पासवर्ड यांसह त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी अशी गोपनीय माहिती विचारली असता गंगाराम यांनी अमिषापोटी ती माहिती त्या अज्ञातास सांगीतली. या प्रकारात गंगाराम यांच्या बँक खात्यातील एकुण 2,89,300 ₹ अन्यत्र स्थलांतरीत झाले.
अशा मजकुराच्या गंगाराम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून उर्वरीत तपास उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्यामार्फत केला जात आहे.