उस्मानाबाद : मानवी जिवीतास, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद - मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे करुन किंवा सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन किंवा कोविड- 19 चे मनाई आदेश झुगारुन दुकान व्यवसायासाठी चालू ठेवून भा.दं.सं. कलम-  283, 285, 188, 269 चे उल्लंघन करणाऱ्या 7 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे 7 गुन्हे उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी 27 मार्च रोजी दाखल केले.

(1) गणेश ऐतवाडे, रा. परंडा यांनी ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 पी 4662 हा ढोकी बसस्थानकासमोरील रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) तानाजी ईटकर, रा. आनाळा, ता. परंडा यांनी इंडीका कार क्र. एम.एच. 12 बीपी 2276 ही आनाळा चौकातील रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे तर दादासाहेब पकाले, रा. ईनगोंदा, ता. परंडा यांनी मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे ईनगोंदा येथील शेळगाव रस्त्यावर आपल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले असतांना आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) सागर चंदनशिवे, रा. बंजारवाडी, ता. भुम यांनी बंजारवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे आपल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर लोकसेवकाने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन उस्मानाबाद येथील गणेश पवार यांनी रात्री 19.45 वा. सु. वरुडा रोड, उस्मानाबाद येथील आपले हॉटेल व्यवसायास चालू ठेउन ग्राहकांची गर्दी जमवून भा.दं.सं. कलम- 188, 269 चे तर रणजित सुर्यवंशी व दिलीप तांबे, दोघे रा. सांजा, ता. उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद शहरात सार्वजनिक रस्त्यावर वेगवेगळ्या दोन ठिकाणी मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे आपापल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.