उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार , एक जखमी 

 

उस्मानाबाद : संदिप नारायण जाधव, रा. उस्मानाबाद हे दि. 26.07.2021 रोजी 18.00 वा. सु. गडपाटी कमानी जवळील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 सी 2433 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने इंडीका कार क्र. एम.एच. 5 बीजी 3071 ही निष्काळजीपने चालवून संदिप जाधव यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या संदिप जाधव यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : अजहर शेख, रा. बार्शी यांनी दि. 05 ऑगस्ट रोजी 16.00 वा. सु. पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 पी 3736 हा ब्रम्हगाव शिवारात बार्शी- परंडा रस्त्यावर निष्काळजीपने चालवून रस्त्याकडेने पायी जाणाऱ्या ग्रामस्थ- वसंत किसन लोंढे, वय 53 वर्षे यांना पाठीमागून धडक दित्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- गणेश लोंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण 

शिराढोण : माळकरंजा, ता. कळंब येथील आकाश  व सोनु भागवत लोमटे या दोघा भावांसह उध्दव लोमटे अशा तीघांनी शेतजमीनीवर कर्ज काढण्याच्या कारणावरुन दि. 05 ऑगस्ट रोजी 15.00 वा. सु. मंगरुळ शेत शिवारात भाऊबंद- छगन गणपती लोमटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या छगन लोमटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.