उस्मानाबाद जिल्ह्यात खून, अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाखल 

 

खून

तुळजापूर: सुभाष दयाल मेघवाल, वय 22 वर्षे, रा. पुरोहितोकाबास, ता. नावासिटी, जि. नागोर, राज्य- राजस्थान (ह.मु. तुळजापूर) यांना शुभम बळीराम जाधव, सिध्दार्थ अरुण गायकवाड, दोघे रा. वेताळगल्ली, तुळजापूर या दोघांनी फोनकरुन 23- 24 मार्च दरम्यानच्या रात्री तुळजापूर येथील मोतीझरा तांड्याजवळील शेतात बोलावून घेउन सुभाष मेघवाल यांना घातक- तिक्ष्ण अवजारांनी मारहाण करुन त्यांचा खून केला आहे. अशा मजकुराच्या ठेकेदार- ईश्वरराम चतराराम मेघवाल, रा. पुरोहितोकाबास यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एक 17 मुलगी (नाव- गाव गोपनीय) 23 मार्च रोजी 10.00 वा. सु. शिकवणीला जाते असे कुटूंबीयांना सांगुन घराबाहेर गेली. ती घरी न परतल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता तीच्याबद्दल उपयुक्त माहिती न मिळाली नाही.

तर दुसऱ्या घटनेत जिल्ह्यातील एका वस्तीगृहातील दोन 17 वर्षीय मुली (नाव- गाव गोपनीय) 23 मार्च रोजी 10.00 वा. सु. वस्तीगृह परिसरातून बेपत्ता झाल्या. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या तीन्ही अपहृत मुलींच्या पालकांनी 24 मार्च रोजी संबंधीत पो.ठा. दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.


“मारहाण.”

नळदुर्ग: जळकोट, ता. तुळजापूर येथील विश्वनाथ व तानाजी विश्वनाथ साळुंके हे दोघे पिता- पुत्र 23 मार्च रोजी 20.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी पुर्वीच्या वादावरून बोरगाव (तु.), ता. तुळजापूर येथील छण्या, तानाजी व मिर्च्या गंगाराम शिंदे, या तीघा बंधूंनी नमूद पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तानाजी साळुंके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा: दिलीप प्रफुल पवार, रा. टाकळी, ता. परंडा हे 23 मार्च रोजी 16.00 वा. सु. परंडा तालुक्यातील आरणगाव येथे आले असता गावकरी- संभाजी विश्वनाथ पिंगळे यांनी दिलीप पवार यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिलीप पवार यांनी 24 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा: रत्नापूर, ता. कळंब येथील शाहु अनंता भांगे व त्यांची मुलगी- विमल यांस गावकरी-जाधवर कुटूंबातील सुजीत, युवराज, अभिजीत, नागरबाई यांसह ज्योती मुंढे यांनी 23 मार्च रोजी 09.25 वा. सु. जुन्या वैमनस्यातून नमूद दोघांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शाहु भांगे यांनी 24 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.