कळंबमध्ये चोरीस गेलेले मंगळसूत्र महिलेला स्वाधीन

 

कळंब: श्रीमती सत्यभामा खरबडे, रा. शिराढोन, ता. कळंब या दि. 11.01.2021 रोजी 15.30 वा. कळंब बसस्थानकातील बस मध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधून एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सुमारे 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला होता. गुन्हा तपासात आरोपीस अटक करुन ते मंगळसुत्र जप्त करण्यात आले होते. 

ते मंगळसुत्र ताब्यात मिळण्या करीता खडबडे यांनी न्यायालयात विनंती अर्ज सादर केल्याने न्यायालयाने ते मंगळसुत्र मुळ मालकाच्या ताब्यात देण्यास आदेशीत केले होते. त्यास अनुसरुन आज 19 मार्च रोजी कळंब पो.ठा. येथे पोनि- तानाजी दराडे यांच्या हस्ते परत करण्यात आले. यावेळी आपले मंगळसुत्र परत मिळाल्याने श्रीमती खरबडे यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

पाहिजे आरोपी ताब्यात

उस्मानाबाद : जीवनावश्यक वस्तू कायदा कलम- 3, 7 नुसार उमरगा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.क्र. 419/2018 मधील आरोपी सिध्दराज लिंबराज माने उर्फ सिध्दनाथ, रा. नारंगवाडी, ता. उमरगा हा गेली 3 वर्ष पोलीसांना हुलकावणी देत होता. त्यास स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, आरसेवाड, कावरे यांच्या पथकाने आज 19 मार्च रोजी उमरगा येथून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहस्तव उमरगा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

            दुसऱ्या घटनेत बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 22 / 2020 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- दादा उध्दव चव्हाण, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यास स्था.गु.शा. च्या सपोनि- मनोज निलंगेकर, पोकॉ- अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, शैला टेळे यांच्या पथकाने आज 19 मार्च रोजी ताब्यात घेउन पुढील कार्यवाहस्तव बेंबळी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

धोकादायकपणे मालवाहतुक करणाऱ्यास 200 ₹ दंडाची शिक्षा

उस्मानाबाद : राजेंद्र काटे, रा. उस्मानाबाद यांनी मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 13 एएन 0856 मध्ये ऊस भरुन निष्काळजीपणे, हयगईने राष्ट्रीय महामार्गावर येडशी टोल नाका येथे वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी आज 19 मार्च रोजी दोषी ठरवून 200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.