लॉकडाउन: २९ एप्रिल  रोजी १२० पोलीस कारवायांत ३५ हजार दंड वसूल 

 

उस्मानाबाद -  लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 29.04.2021 रोजी खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 60 कारवायांत- 12,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 33 कारवायांत- 16,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 26 कारवायांत 5,200/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 1 कारवाईत 1,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन: मनाई आदेश झुगारुन हॉटेल चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद -  कोविड- 19 संसर्गास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन ताजुद्दीन निसार शेख, रा. मिली कॉलनी, उस्मानाबाद यांनी दि. 29 एप्रील रोजी 18.45  रोजी उस्मानाबाद येथील ‘निसार हॉटेल- ढाबा’ हा व्यवसायास चालू ठेवला. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोकॉ- बालाजी कटकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 269, 188 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना कायदा कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.