लॉकडाउन: २८ एप्रिल रोजी १०३ पोलीस कारवायांत ३२ हजार दंड वसुल

 

उस्मानाबाद - लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 28.04.2021 रोजी खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 10 कारवायांत- 2,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 31 कारवायांत- 15,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 60 कारवायांत 12,300/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 2 कारवायांत 2,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन: मनाई आदेशांचे उलंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 शिराढोण: कोविड- 19 संसर्गास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन पंडीत भगवान माळी, रा. मंगरुळ, ता. कळंब यांनी दि. 28 एप्रील रोजी 20.00 वा. सु. गावात विनाकारन फिरुन कोविड- 19 च्या संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन गृहरक्षक दलाचे जवान- उमाकांत तपीसे यांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 269, 188 सह म.पो.का. कलम- 110/117 सह साथीचा रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.