कळंब मधील एकास सिम कार्डची  केवायसी पडली महागात 

 भामट्याने घातला ९५ हजाराचा गंडा  
 

कळंब:  कळंब मध्ये एकास 'तुमचे सिम बंद होणार आहे', असा खोटा मेसेज पाठवून नंतर केवायसीनावाखाली एका भामट्याने बँक खात्यातील ९५ हजार रुपये अन्य खात्यावर स्थलांतरीत करून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

अजय रमेश घोडके, रा. कळंब यांच्या मामाच्या भ्रमणध्वनीवर दि. 22 मे रोजी 18.48 वा. सु. एका अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरुन संदेश आला की, “तुमचे सिम बंद होणार आहे.” यावर अजय यांच्या मामाने संदेश आलेल्या क्रमांकाशी संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने, “मी अमित मिश्रा बोलत असुन तुच्या सिम सत्यापनासाठी केवायसी अद्ययावत करणे आवश्यक असुन  काही रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.”

 यावर अजय यांच्या मामाने त्यांच्या डेबीड कार्टवरील अंक व आवश्यक माहिती त्या समोरील व्यक्तीस सांगीतली. यावर त्या व्यक्तीने अजय यांच्या मामाच्या भ्रमणध्वनीवर बँकेकडून आलेले 5 ओटीपींचे लघू संदेश विचारुन घेउन अजय यांच्या मामांच्या बँक खात्यातील एकुण 94,950 ₹ रक्कम ऑनलाईन पध्दतीने अन्य खात्यात स्थलांतरीत केली. अशा मजकुराच्या अजय रमेश घोडके यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

 परंडा: सलगरा रोड तांडा, गंधोरा, ता. तुळजापूर येथील 1)गणेश सुभाष राठोड 2)छमाबाई सुभाष राठोड 3)धोंडीबा सुभाष राठोड या तीघांनी त्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडु नये म्हणुन पत्र्यावरुन तारा बांधल्या होत्या. घरातील विद्युत वायरमधील विद्युत प्रवाह पत्र्यात उतरल्याने शेजारील प्रतिज्ञा अमर पवार ही 12 वर्षीम मुलगी सुभाष राठोड यांच्या घराजवळील बोळीतून दि. 21 मे रोजी 09.30 वा. सु. जात असतांना पत्र्यावरुन खाली आलेल्या तारेस तीचा हात लागल्याने तीच्या अंगात विद्युत प्रवाह संचारीत होउन ती मयत झाली. अशा मजकुराच्या नामदेव धर्मा राठोड, रा. सलगरा रोड तांडा, गंधोरा यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ), 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

उस्मानाबाद  जिल्ह्यातील एका गावातील दोन 17 वर्षीय मुली (नाव- गाव गोपनीय) दि. 24- 25.05.2021 दरम्यानच्या रात्री कुटूंबीयांस काहि न सांगता राहत्या घरातून निघून गेल्या. कुटूंबीयांनी त्या दोघींचा शोध घेतला असता त्यांच्याबद्दल उपयुक्म माहिती न मिळाल्याने त्या दोघीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलींच्या पालकाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.