उस्मानाबाद जिल्ह्यात अपहरण, लैंगिक छळ, मारहाणीचे गुन्हे दाखल 

 

ढोकी: ढोकी पो. ठा. हददीतील एका गावातील 17 वर्षीय मुलगी 8 एप्रिल रोजी मध्यरात्री घरातुन बेपत्ता झाल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता तीची काही माहीती मिळाली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या पित्याने 9 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा. दं. सं. कलम 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लैंगिक छळ

उस्मानाबाद - जिल्हयातील एका गावातील 27 वर्षीय विवाहीत महीला 9 एप्रिल रोजी 12.00 वा. घरात एकटीच होती. यावेळी संधी साधुन गावातीलच एका तरुणाने तीच्या घरात घुसुन तीच्या समोर प्रेम प्रस्ताव देउन तीला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या महीलेने झटापट करुन त्याचा विरोध केला असता त्याने तीला शिवीगाळ करुन या प्रकरणाची कोठेही वाच्यता न करण्याची अन्यथा तीला ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या संबंधित महीलेने 9 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा. दं. सं. कलम 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण

नळदुर्ग : हमीद नजीर बागवान, रा. नळदुर्ग यांना गावकरी अमिर सय्यद व त्यांची तीने मुले हुसेन, बिलाल, हसन यांनी  दि. 08.04.2021 रोजी 16.00 वा. मुलतान गल्लीत बांधकामाच्या वादातुन शिवीगाळ करुन काठी व दगडाने मारहाण केली. तसेच  ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हमीद यांच्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद -  भारत डीकुळे, रा. भवानी चौक, यांच्या जागेचे कुंपन व कुंपनातील आंबा, अशोक वृक्ष दि. 21.02.2021 रोजी अर्जुन देवकर व मोहन सुरवसे यांनी ट्रक्टर द्वारे उध्वस्त केली. याचा विरोध डीकुळे यांनी केला असता त्यांना शिवीगाळ करुन गाडुन टाकण्याची धमकी देउन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या डीकुळे यांनी दि. 09 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 447, 427, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.