उस्मानाबाद, शिराढोण,नागेवाडी येथे चोरीची घटना 

 

कळंब : उज्वला प्रशांत कोंडेकर, रा. शिराढोण , ता. कळंब या दि. 16 जुलै रोी 03.00 वा. सु. बसस्थानक, कळंब येथील बसमध्ये चढत असतांना त्यांच्या जवळील 18 ग्रुम सुवर्ण दागिने गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या उज्वला कोंडेकर यांनी दि. 17 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी : अर्जुन भिमराव साळुंके, रा. नागेवाडी, ता. वाशी यांच्यासह गावातील अन्य दोघांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 16- 17 जुलै दरम्यानच्या रात्री तोडून एकत्रीत 13 ग्रॅम सुवर्ण दागिने व 9,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अर्जुन साळुंके यांनी दि. 17 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद : अरुण बाबुराव नरगिडे, रा. बालाजीनगर, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 17 जुलै रोजी 12.30 ते 13.00 वा चे दरम्यान उघडून आतील 45 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 25,000 ₹ किंमतीचे चांदीचे दागिने व 11,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अरुण नरगिडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात 

कळंब : अच्युत श्रीपती कांदे, वय 49 वर्षे, रा. सापनाई, ता. कळंब हे दि. 15 जुलै रोजी 16.30 वा. सु. खेर्डा येथील येडशी- कळंब रस्त्यालगत थांबले होते. यावेळी विष्णु हरीभाउ माळी, रा. मस्सा  (खं.), ता. कळंब यांनी बस क्र. एम.एच. 14 बीटी 1629 ही निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवून अच्युत कांदे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या बाबासाहेब सोपान बाराते, रा. सापनाई यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.