डिकसळ, झिन्नर येथे चोरीची घटना
कळंब : बालीका गाडेकर, रा. संभाजीनगर, डिकसळ, ता. कळंब या दि. 23- 24 जुलै दरम्यान बाहेर गावी गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडून आतील एलईडी टीव्ही संच, 34 ग्रॅम सुवर्ण दागिने, एक जोड चांदीचे पैजन व 500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या बालीका गाडेकर यांनी दि. 25 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : मुकूंद नामदेव माळी, रा. झिन्नर, ता. वाशी यांच्या दसमेगांव गट क्र. 273 मधील शेत गुदामातील प्रत्येकी 5 व 3 अश्वशक्ती क्षमतेचे दोन पानबुडी विद्युत पंप, 1,200 फुट वायर व गुदामाबाहेरील जनरेटरचे आर्मेचर असे एकुण 61,500 ₹ चे साहित्य दि. 24- 25 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मुकूंद माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाणीचे दोन गुन्हे
उस्मानाबाद - आकाश जनार्धन डोंगे, रा. देशपांडे स्टॅन्ड, उस्मानाबाद हे दि. 24 जुलै रोजी 17.00 वा. सु. देशपांडे स्टॅन्ड येथील ‘किर्ती डिजीटल’ या आपल्या दुकानात होते. यावेळी परिसरातील रहिवासी- राकेश खळतकर यांसह गल्लीतीलच अनिल असलेकर, विजय कुलकर्णी, प्रमोद जाधव, चंदु जाधव अशा पाच जणांनी आकाश डोंगे यांनी तेथे येउन, “तु झाड का तोडलेस ?” असा जाब आकाश यांना विचारुन डोंगे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व दुकानातील साहित्याची, दुकानासमोरील डोंगे यांच्या मोटारसायकलची तोडफोड करुन आर्थिक नुकसान केले आणि दुकानासमोरील विद्युत फलक, शिडी, ग्राइंडर असे साहित्य घेउन गेले. अशा मजकुराच्या आकाश डोंगे यांनी दि. 25 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 452, 324, 323, 504, 506, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी - वाणेवाडी, ता. उस्मानाबाद येथील रामचंद्र नागनाथ उंबरे व गोरोबा रामचंद्र उंबरे या दोघे पिता- पुत्रांनी भुखंडाच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 25 जुलै रोजी राहत्या गल्लीत भाऊबंद- उत्तम नागनाथ उंबरे यांसह त्यांची पत्नी- रुक्मीन, मुलगा- भिमाशंकर यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड- विटाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या उत्तम उंबरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.