उस्मानाबादेत महिलेची फसवणूक 

 

उस्मानाबाद  - जहागीरदारवाडी येथील मधल्या तांड्यातील रहिवाशी श्रीमती- ताईबाई चव्हाण या दि. 28 जुलै रोजी 09.00 वा. छ. शिवाजी महाराज चौक- राजा कॉम्प्लेक्स या मार्गाने पायी जात होत्या. यावेळी तीन अनोळखी पुरुषांनी त्यांना अधिक वजनाचे सोने देउ करुन त्या  मोबदल्यात त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम सुवर्ण गंठनाची मागणी केली. 

या आमिषाला बळी पडून ताईबाई यांनी आपले गंठन त्या अज्ञातांस देउन त्या मोबदल्यात त्यांच्याकडून जास्त वजनाचे सोने घेतले असता ते सोने बनावट असल्याचे  थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या ताईबाई चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपने वाहन उभे करणाऱ्या दोन चालकांवर गुन्हे दाखल

मुरुम  1) राहुल धुळप्पा तुगावे, रा. बेळंब, ता. उमरगा यांनी दि. 28 जुलै रोजी 18.00 वा. कमांडर जीप क्र. एम.एच. 14 एई 4401 ही मुरुम येथील चौकात सार्वजनिक रस्त्यावर तर 2) अहेमद अलीम शेख, रा. उमरगा यांनी 19.00 वा. ॲटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एन 372 हा मुरुम मोड येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम-283 चे उल्लंघन केले. यावरुन मुरुम पो.ठा. चे पोकॉ- श्रीराम सोनटक्के यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

आंबी : 1) कृष्णा महादेव घाडगे 2) गणेश भाउसाहेब देवकर, दोघे रा. सोनारी, ता. परंडा या दोघांनी दि. 28 जुलै रोजी 15.00 वा. सु. सोनारी येथील चौकात आपापल्या हातगाड्यावरील शेगडीत निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका होईल असे निष्काळजीपनाचे कृत्य करुन भा.दं.सं. कलम-285 चे उल्लंघन केले. यावरुन आंबी पो.ठा. चे पोहेकॉ- सदाशिव काळेवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.