उमरगा, उस्मानाबाद येथे चोरीच्या चार घटना 

 

उमरगा  - राजकुमार नवनाथ वायबसे, रा. मानेनगर, उमरगा यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 44 एम 1036 ही दि. 28- 29 जुलै दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. तर दुसऱ्या घटनेत काशिनाथ विलास सुर्यवंशी, रा. लातुर यांनी त्यांची बजाज सीटी मोटारसायकल क्र. एम.एच. 24 एएल 6015 ही दि. 29 जुलै रोजी 14.00 ते 15.00 वा. दरम्यान उमरगा चौरस्ता येथील श्रध्दा हॉटेलबाजूस लावली असता ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे.

अशा मजकुराच्या राजकुमार व काशिनाथ सुर्यवंशी या दोघांनी दि. 30 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद -  उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचा कडी- कोयंडा दि. 24- 25 जुलै दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून आतील टीसीएल कंपनीचा एलईडी टीव्ही चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या शाळा मुख्याध्यापक- महेश अनपट यांनी दि. 30 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 461 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  प्रविण शिवाजी माळी, रा. उस्मानाबाद यांच्या उस्मानाबाद येथील गट क्र. 301 मधील शेत गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी व एक रेडकू दि. 29- 30 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रविण माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत वैराग रोड शिवारातील महावितरणच्या खांबावरील 120 मीटर ॲल्युमिनीयम तार दि. 26- 27 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महावितरण, शाखा उस्मानाबाद येथील तंत्रज्ञ- राजाराम पडवळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.