चार गुन्ह्यातील चार आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

 

उस्मानाबाद -  जिवीतास धोका होईल अशातऱ्हेने निष्काळजीपणे वाहन चालवून मिथुन भारत ओव्हळ, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी काल 16 मार्च रोजी दोषी ठरवून 500 ₹दंडाची शिक्षा सुनावली आहे.

उस्मानाबाद -  निष्काळजीपणे वाहन चालवल्याने अपघात होउन वाहनाचे नुकसान केल्याबद्दल मोहन शिवाजी खामकर यांना भा.दं.सं. कलम- 279, 429 च्या उल्लंघनाबद्दल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी काल 16 मार्च रोजी दोषी ठरवून 500 ₹दंड व दंड न भरल्यास 8 दिवसाच्या साध्या कारावासाची सुनावली आहे.

तामलवाडी: मानवी जिवीत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल अशा निष्काळजीपणे तामलवाडी येथील रस्त्यावर ऑटोरीक्षा उभ्या करणाऱ्या हगलूर, ता. सोलापूर येथील सचिन शिंदे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी आज 17 मार्च रोजी दोषी ठरवून 200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

परंडा: जामीन मुक्त झालेल्या दादाराव रामलिंग गव्हाळे, रा. रोसा, ता. परंडा यांनी न्यायालयात सुनावनीस हजर राहन्याबाबत टाळाटाळ केल्याने त्यांच्याविरुध्द न्यायालयाने समन्स काढले होते. तरीही दादाराव हे न्यायालयात सुनावनीस हजर राहत नसल्याने त्यांच्याविरुध्द परंडा पो.ठा. पोलीसांनी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी दादाराव यांना  काल 16 मार्च रोजी भा.दं.सं. कलम- 229 (अ) च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून 200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जुगार विरोधी कारवाया

परंडा: माणकेश्वर, ता. भुम येथील रमेश शंकर चव्हाण हे 15 मार्च रोजी गावातील जगदंबा हॉटेल जवळील झाडाखाली सुरट मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने साहित्य व 410 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, ढोकी: ढोकी, ता. उस्मानाबाद येथील मजीद रशीद शेख हे 16 मार्च रोजी ढोकी पेट्रोल पंप चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 300 ₹ रक्कम बाळगले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाया

ढोकी: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन ढोकी पो.ठा. च्या पथकाने 16 मार्च रोजी पो.ठा. हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले.

पहिल्या घटनेत पारधी पिढी, ढोकी येथील रतनबाई विनायक काळे या राहत्या पिढीवर 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 950 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.

दुसऱ्या घटनेत कोंड, ता. उस्मानाबाद येथील श्रावण श्रीपती जाधव हे आपल्या राहत्या घरासमोर 12 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 600 ₹) बाळगले असतांना आढळले.

तिसऱ्या घटनेत पारधी पिढी, तेर येथील रमेश देवराव पवार हे तेर बसस्थानजवळील पत्रा शेडमध्ये 9 ‍लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 370 ₹) बाळगले असतांना आढळले.

 परंडा: राजुरी, ता. परंडा येथील सुनिता रमेश पवार या 16 मार्च रोजी राहत्या गल्लीत 05 लि. अवैध गावठी दारु ( किं.अं. 550 ₹) बाळगल्या असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

            सावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.