अंबेजवळग्यातील खूनाच्या गुन्ह्यातील चार आरोपी अटकेत
उस्मानाबाद : अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद येथील प्रितम राजाभाऊ साबळे, वय 24 वर्षे यांचा दि. 31 जुलै रोजी रात्री 11.00 वा. पुर्वी गावातीलच काही पुरुषांनी पुर्वीच्या वादातून खून करुन पोबारा केला होता.
त्यांचा ठावठिकाणा समजत नसल्याने उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पोनि- . दत्तात्रय सुरवसे, सपोनि- श्री. शिंदे, श्री. रोकडे, पोहेकॉ- चौधरी, कांबळे, खंदारे, पोना- वाघमारे, भातलवंडे यांचे पथक त्यांच्या मागावर होते. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे भडाचिवाडी शेत शिवारात आरोपी लपून असल्याची माहिती मिळताच पथकाने भडाचिवाडी शिवारात सापळा रचून आरोपी- 1) सुरज शेषेराव चांदणे, वय 26 वर्षे 2) पवन शेषेराव चांदणे, वय 24 वर्षे 3) तेजस कृष्णा चांदणे, वय 21 वर्षे 4)सौरभ सत्यवान चांदणे, वय 23 वर्षे, सर्व रा. आंबेजवळगा, ता. उस्मानाबाद यांना दि. 06 ऑगस्ट रोजी अटक केली आहे.
दोन गुन्ह्यातील आरोपींना प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा
परंडा : निष्काळजीपनाची कृतीद्वारे कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन केल्याबद्दल 1) जिलानी महेबुब पठाण 2) हिरालाल जनार्धन पेडगावकर यांना प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी काल दि. 05 ऑगस्ट रोजी सुनावली आहे.
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल
तुळजापूर : 1) निलेश नागनाथ दराडे 2) ज्ञानेश्वर विलास लाटे, दोघे रा. बार्शी हे दोघे दि. 05 ऑगस्ट रोजी 21.30 वा. सु. तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाजवळ आपापसात शिवीगाळ करुन भांडणे करुन झुंजतांना तुळजापूर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 160 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.