उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांतून चोरलेल्या सात मोटारसायकलसह चार आरोपी अटकेत

 

कळंब: अक्षय जगन्नाथ धपाटे, रा. कळंब हे त्यांच्या आईस कोविड- 19 ची लस देण्यासाठी त्यांच्या वडीलांच्या नावे असलेली स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एएन 3183 ही दि. 01.06.2021 रोजी 06.00 ते 08.15 वा. दरम्यान शहरातील विद्याभवन शाळेसमोर लावून लसीकरण केंद्रात गेले असतांना दरम्यानच्या काळात त्यांची नमूद मो.सा. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावरुन कळंब पो.ठा. गु.र.क्र. 188 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

            सदर गुन्ह्याचा तपास कळंब पो.ठा. चे पोनि तानाजी दराडे, पोहेकॉ- कोळेकर, पोना- पठाण, पोकॉ- हांगे, मिनाज शेख, शिवाजी राउत, सादीक शेख, शिवाजी सिरसाट हे करत होते. तपासादरम्यान पथकास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, 1)लखन उत्रेश्वर दळवे, वय 32 वर्षे 2) गोपाळ लक्ष्मण लांडगे, वय 30 वर्षे, दोघे रा. सावरगाव (पु.), ता. कळंब 3)सलमान वाजेदखान पठाण, वय 31 वर्षे, रा. डिकसळ, ता. कळंब 4) फारुख महेबुब तांबोळी, वय 23 वर्षे, रा. कळंब हे चौघे चोरीच्या मोटारसायकल बाळगून आहेत.

 यावर पथकाने आज दि. 02 जून रोजी नमूद चौघांना ताब्यात घेउन विचारपुस केली असता त्यांच्या ताब्यात नमूद गुन्ह्यातील चोरीची मो.सा. सह अन्य 6 मोटारसायकल आढळल्या. या 7 मोटारसायकलच्या मालकी- ताबा विषयी त्या चौघांना विचारपुस केली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही. यावर पोलीसांनी मो.सा. चा सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या सहायाने तांत्रीक तपास केला असता त्या मो.सा. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातून चोरीस गेल्याचे समजले. यावर पथकाने नमूद चौघांना नमूद चोरीच्या सात मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. तसेच बीड जिल्ह्यातील चोरीच्या मो.सा. बाबत बीड पोलीसांना कळवण्यात आले असुन त्या विषयी उर्वरीत तपास बीड पोलीस करणार आहेत.