उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या पाच घटना 

 

कळंब : महादेव विश्वनाथ हावळे, रा. ईटकुर ता. कळंब हे 15 एप्रिल रोजी 21.30 वा. घरासमोर होते.  यावेळी  मुलगा महेश, पत्नी सुनंदा यांनी टायर पंक्चरचे दुकान बंद ठेवण्याचे कारणावरुन महादेव यांना  शिवीगाळ करुन विटाने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या महादेव हावळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग : अमृत केशव पाटील, रा. केशेगाव, ता. तुळजापुर हे दि. 15.04.2021 रोजी 21.30 वा. शेतात होते. यावेळी गावकरी बाबु बिराजदार, यांनी जुन्या वादावरुन अमृत यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. दगडाने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पाटील यांनी 16 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : बाबु साताप्पा बिराजदार, रा. केशेगाव, ता. तुळजापुर हे दि. 15.04.2021 रोजी 21.30 वा. शेतात होते. यावेळी गावकरी अमृत केशव पाटील, यांनी जुन्या वादावरुन अमृत यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. काठीने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या पाटील यांनी 16 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब : निलेश शिवाजी गांजीकर, रा. कळंब हे 15 एप्रिल रोजी 14.00 वा. घरासमोर होते.  यावेळी शहरातील  सम्राट, शक्ती गायकवाड, आंशु कसबे, अमोल राउत यांनी भांडणाची कुरापत काढुन निलेश यांना  शिवीगाळ करुन लाकडी बांबुने व तलवारने हातावर  मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निलेश यांच्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : सम्राट मश्चिंद्र गायकवाड, रा. कळंब हे 15 एप्रिल रोजी 12.40 वा. आकाश खंडाळे यांना फोन का केलास असे विचारण्यास गेले होते.  यावेळी आकाश, अक्षय, प्रकाश खंडाळे, निलेश गांजीकर यांनी घराकडे का आलास असे भांडण  काढुन सम्राट यांना  शिवीगाळ करुन लाकडी काठीने व दगडाने  मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सम्राट यांच्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.