उस्मानाबाद जिल्ह्यात दहा आरोपींना आर्थिक दंडात्मक शिक्षा 

 

उस्मानाबाद  - कोरोना मनाई आदेशांचे उल्लंघन: जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोविड- 19 संबंधी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणा-या सहा आरोपींस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पुढील प्रमाणे शिक्षा सुनावल्या आहेत.

            तुळजापूर पोठा हददीतील युवराज अर्जुन माळी, रा.काटगांव यास 500 रु तर  तामलवाडी पोठा हददीतील एका व्यक्तीस 500 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.

उस्मानाबाद ग्रामीण पोठा हददीतील आळणी  येथील आगतराव किर्दत यांसह आंबी  पोठा हददीतील रफीक शेख, व अनिल झीरपे यांना प्रत्येकी 500 रु दंडाची शिक्षा तर परंडा पोठा हददीतील रसुल तुटके यांना 200 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जुगार : जुगार खेळुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 अ चे उल्लघंन करणा-या पुढील तीन आरोपींस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पुढील प्रमाणे शिक्षा सुनावल्या आहेत.

            लोहारा पोठा  हददीतील रंगराव व्यंकट  चिवरे रा. सास्तुर यास 500 रु दंडाची तर बेंबळी पोठा हददीतील गोविंदिसिंग बायस रा.ताकविकी  यांसह अन्य एका व्यक्तीस   प्रत्येकी  500 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सार्वजनिक ठिकाणी धोकादायक वर्तन : लोहारा पोठा हददीत रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यात वाहन उभे करुन भादसं कलम 283 चे उल्लंघन करणा-या सास्तुर येथील सोहेल रहमान शेख यांना 100 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.

कोविड मनाई आदेश झुगारुन व्यवसायास चालू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्याबददल दि. 28 जून रोजी पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत खालील प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

            उस्मानाबाद ग्रामीण पोठा हददीत काजळा गावात राजेंद्र क्षिरसागर, विशाल आहेर यांनी आपापल्या पानटप-याव्यवसायास चालु ठेवल्या असल्याचे तर सोनेगांव येथे विशाल माने व बापु गोफणे यांनी आपापली किराणा दुकाने व्यवसायास चालु ठेवली असल्याचे उस्मानाबाद गा्रमीण पोलीसांना आढळले. येथे  पान टपरी व्यवसायास चालु ठेवली असल्याचे हे उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास आढळले.

            परंडा पोठा हददीत शिराळा येथे राजेंद्र माळी व अशोक शिंदे यांनी आपापली किराणा दुकाने व्यवसायास चालु ठेवली असल्याचे परंडा पोलीसांना आढळले.