कोविड- 19 च्या अनुषंगाने जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद -  कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने विविध मनाई आदेश जारी केले असून सर्व प्रकारच्या आंदोलनास मनाई आहे. तरीही दुधाळवाडी, ता. कळंब येथील केरबा ज्ञानोबा सिरसट हे  यांनी 01 एप्रील रोजी 11.30 वा. सु. रॉकेलचा कॅन घेउन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलनास आले. अशा प्रकारे सिरसट यांनी कोविड- 19 च्या संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची कृती केली. यावरुन पोहेकॉ- खंडेराव गांधले यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: कोविड- 19 च्या संसर्गास आळा बसण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पानटपऱ्या संदर्भात मनाई आदेश जारी केले असतांना ते आदेश झुगारुन 01 एप्रील रोजी 16.30 वा. आझाद कलीम काझी, रा. नळदुर्ग यांनी नळदुर्ग बसस्थानकाजवळील ‘के.के. स्टेडर्स पानटपरी’ व्यवसायास चालू ठेउन मानवी जिवीतास धोकायदायक अशा कोविड- 19 च्या संसर्गाची शक्यता निर्माण होईल अशी कृती केली. यावरुन पोकॉ- अमोल फत्तेपुरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मानवी जिवीतास, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या 2 चालकांवर गुन्हे दाखल 

कळंब: महेश बळीराम दोडके, रा. माळेगाव, ता. केज यांनी ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 44 यु 0281 हा कळंब बसस्थानक समोर तर अरुण चंद्रहास गाडे, रा. गंभीरवाडी, ता. कळंब यांनी पिकअप क्र. एम.एच. 25 पी 3766 हा होळकर चौक, कळंब येथे मानवी जिवीतास धोका होईल, रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभे केले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास 01 एप्रील रोजी आढळले. यावरुन पोलीसांनी नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.