उस्मानाबाद, तुळजापूर, बेंबळी, कळंब येथे चोरीचे गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद  : अशोक दत्तात्रय रणसुभे, रा. उस्मानाबाद यांची टीव्हीएस मॅक्स 100 मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डी 9129 ही दि. 24 ऑगस्ट रोजी 09.00 ते 09.30 वा. दरम्यान देशपांडे स्टँड येथील भाजीमंडईजवळून अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : जोतीबा बांगल, रा. सांगवी (मा.), ता. तुळजापूर यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 04 जेडब्ल्यु 1562 ही दि. 17 ऑगस्ट रोजी 16.00 ते 16.30 वा. दरम्यान सांगवी शिवारातील त्यांच्या शेताजवळील रस्त्याकडेला लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत तुळजापूर येथील शुभम दिपक हिबारे यांच्या तुळजापूरातील ‘अंबीका ईलेक्ट्रीक’ च्या छताचा पत्रा अज्ञाताने दि. 28 ऑगस्ट रोजीच्या रात्री उचकटून आतील 25,000 ₹ रोख रक्कम, एक डीव्हीआर बॉक्स व एक क्रेडीट कार्ड चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : नामदेव मनोहर गुळवे, रा. खामसवाडी, ता. उस्मानाबाद यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने दि. 27- 28 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री तोडून घरातील 51 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, दोन भ्रमणध्वनी व 75,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : मधुकर आगलावे, रा. हासेगाव (के.), ता. कळंब यांची एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एएफ 7703 ही दि. 24- 25 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : महादेव वाघमारे, रा. टेलरनगर यांनी त्यांच्या राहत्या घराजवळील अंगनात ठेवलेले बैल, गाय, खोंड, कालवड प्रत्येकी एक असे एकुण 4 जनावरे दि. 27- 28 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.