शेतातील ऊसाचे पिक पेटवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

 तामलवाडी: गोंधळवाडी, ता. तुळजापूर येथील भालचंद्र रावसाहेब मोटे यांच्या गोंधळवाडी गट क्र. 236 मधील 1 एक्कर ऊस भाऊबंद- यशवंत भिमराव मोटे यांनी 18 मार्च रोजी 12.00 वा. सु. पेटवून अंदाजे 1,00,000 ₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या भालचंद्र मोटे यांनी 19 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

तुळजापूर: नरसिंह प्रभाकर वेदपाठक, रा. समर्थनगर, तुळजापूर यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने 18- 19 रोजी दरम्यानच्या रात्री तोडून आतील 300 ग्रॅम चांदीचे दागिने व 20,000 ₹ असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या नरसिंह वेदपाठक यांनी 19 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

अपघात

तुळजापूर: अज्ञात चालकाने 17 मार्च रोजी 17.45 वा. सु. काक्रंबा बसस्थानक येथे कार क्र. एम.एच. 25 आर 827 ही निष्काळजीपणे चालवून पायी जाणाऱ्या जिलानी अहमद मुलानी यांना समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- इसाक मुलानी यांनी 19 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: ज्ञानेश्वर इंद्रजित काटकर, रा. वाडीबामणी, ता. उस्मानाबाद हे दि. 28.02.2021 रोजी 09.30 वा. सु. करजखेडा येथील डोंगरे बस्तीवरील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 14 जीव्ही 0703 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मिनीट्रक क्र. एम.एच. 13 एएच 9122 ही निष्काळजीपणे चालवून ज्ञानेश्वर काटकर यांच्या मो.सा. ला डाव्या बाजूने धडक दिल्याने ज्ञानेश्वर यांच्या डाव्या खांद्याचे व बरगडीचे हाड मोडले. या अपघातानंतर नमूद मिनीट्रकचा अज्ञात चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.