मनाई आदेश झुगारुन दुकान चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

तुळजापूर: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जिल्ह्यात विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन विनायक एकनाथ ढगे, रा. तुळजापूर यांनी दि. 28 मे रोजी 18.00 वा. सु. तुळजापूर (खुर्द) येथील आपले ‘आर्या जनरल स्टोअर्स’ दुकान व्यवसायास चालू ठेउन ग्राहकांची गर्दी जमवून भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

ब्रेक द चेन: दि. 28.05.2021 रोजी 482 पोलीस कारवायांत 1,05,300/-रु. दंड वसुल.

उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 28.05.2021 रोजी खालील तीन प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 02 कारवायांत- 400/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 27 कारवायांत- 13,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 453 कारवायांत 91,400/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 मुरुम: व्यंकट रामचंद्र राठोड, रा. आलुर, ता. उमरगा हे दि. 28 मे रोजी गावातील अक्कलकोट रस्त्यालगत 08 लि. गावठी दारु (किं.अं. 850 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना मुरुम पो. ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी गावठी दारु जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.