उस्मानाबाद शहरात दोन ठिकाणी हाणामारी
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शहरातीलच बोंबले हनुमान चौकातील अभिजीत नारायण पतंगे यांना दि. 06 ऑगस्ट रोजी 18.30 वा. फोन कॉल करुन शहरातील सुप्रिया बारजवळ बोलावून घेतले. यावर अभिजीत पतंगे तेथे गेले असता ज्ञानेश्वर यांसह दोन अनोळखी पुरुषांनी राजकीय वैमनस्यातून अभिजीत यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन, डोक्यात काचेच्या भरण्या फोडून जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अभिजीत पतंगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : शेतात झालेल्या पुर्वीच्या वादातून व घरभाडे न दिल्याच्या कारणावरुन पापनासनगर, उस्मानाबाद येथील पुजा कानवले यांसह त्यांच्या मुलास प्रभाकर माळी यांनी दि. 06 ऑगस्ट रोजी 16.00 वा. राहत्या गल्लीत शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन दगड फेकून मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या पुजा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
शिरढोण : बालकांच्या खेळण्यातील वादाचे पर्यावसान पालकांच्या हानामारीत होउन रांजणी ग्रामस्थ- शिवाबाई व सोमनाथ आडाप्पा ईटकर, शिलाबाई व लक्ष्मण आडाप्पा ईटकर या दोघा कुटूंबीयांनी गावकरी- अनिल वैजिनाथ देवकर यांसह त्यांच्या पत्नीस दि. 04 ऑगस्ट रोजी 19.00 वा. राहत्या गल्लीत शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी व वेळुने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अनिल देवकर यांनी दि. 06 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : तहसील कार्यालय, उस्मानाबाद येथील कोतवाल- संपत नामदेव माने हे दि. 06 ऑगस्ट रोजी 15.40 वा. तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात कर्तव्यावर होते. यावेळी रुईभर ग्रामस्थ- ज्ञानेश्वर शिवाजी निंबाळकर यांनी संपत माने यांची गचांडी पकडून, चापट व बुक्क्याने मारहान करुन, “ माझी तक्रार करतो, तु बाहेर ये तुला बघतो.” अशी धमकी देउन त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला. यावरुन संपत माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.