उमरगा तालुक्यात तीन ठिकाणी हाणामारी 

 

 मुरुम:  आलुर येथील जमील मियॉजानी पिरजादे व कलीम घुडुसाब लोहारे  या दोन्ही   कुटुंबीयांचा  दिनांक  30 जुन रोजी 12.00 वा गावामध्ये शेत मालकी व अतीक्रमणाच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस  शिवीगाळ करुन, खुनाची धमकी देउन, एकमेकांवर दगडफेक करुन  लाथा बुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दिनांक 30 जुन रोजी दिलेल्या परस्पर विरोधी दोन प्रथम खबरे वरुन भादसं 326, 324,323, 504,506, 34  अंतर्गत दोन गुन्हे नोंदवले आहेत.

उमरगा:  साधु  व लक्ष्मण गायकवाड   हे दोघे  पिता-पुत्र रा.जकेकुरवाडी  हे  दिनांक 30 जुन रोजी 12.00 वा गावातील आपल्या शेतात होते. यावेळी शेत मोजणीच्या वादातुन  गावकरी-कुमार जाधव यांसह  त्यांची तीन मुले- रत्नदीप, कुलदीप, प्रदीप अशा चौघांनी लक्ष्मण यांना अनुसुचित जातीवाचक शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी , काठीने  मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 324, 504, 506, 34 सह अनुसुचित जाती- जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम :  महादेवी चव्हाण रा.उमरगा या  दिनांक 30 जुन रोजी 10.30 वा चिंचोली (भुयार) येथील  आपल्या शेतात होत्या. यावेळी शेतात अतिक्रमण करुन पेरणी करण्याच्या वादातुन गावकरी-सुरेखा व अनिल सुर्यवंशी, रुक्मीण  व तानाजी सुर्यवंशी  या पती-पत्नीसह ताई अनिल सुर्यवंशी यांनी  शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.