टाकळी,जवळे, खसगी, कनगरा, समुद्रवाणी येथे हाणामारी 

 

 ढोकी: अर्मिला पाटील, रा. टाकळी (ढोकी), ता. उस्मानाबाद या दि. 19 मे रोजी 17.00 वा. सु. गट क्र. 140 मधील आपल्या शेतातील पिकास पाणी देत होत्या. यावेळी गावकरी- विशाल मिसन भोसले हे त्या शेतातून जात असल्याने उर्मिला यांनी पिकातून न जाण्याचे सांगीतले असता चिडून जाउन विशाल भोसले यांसह किसन भोसले, ज्योती भोसले, सुरेखा भोसले अशा चौघांनी उर्मिला यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विशाल भोसले यांनी उर्मिला यांच्या हातावर विळ्याने वार करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उर्मिला पाटील यांनी दि. 20 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत बब्रुवान काटे, रा. जवळे (दु.), ता. उस्मानाबाद हे दि. 19 मे रोजी 22.00 वा. सु. आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी शेजारील सविता काळे यांनी काटे यांच्या दारात खरकटे पाणी टाकल्याने बब्रुवान काटे यांनी त्याचा जाब विचारला असता तानाजी व सविता काळे या दोघा पती- पत्नींनी बब्रुवान काटे यांना शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. बब्रुवान यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नी- अश्विनी यांनाही नमूद दोघांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अश्विनी काटे यांनी दि. 20 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: पल्लवी दिगंबर गुरव, रा. खसगी, ता. उमरगा या दि. 19 मे रोजी 16.00 वा. सु. खसगी शिवारातील आपले शेत ट्रॅक्टरच्या सहायाने नांगरत होत्या. यावेळी नातेवाईक- संतोष गुरव, प्रविण गुरव, गजेंद्र गुरव, लक्ष्मण गुरव, शोभा गुरव या पाच जणांनी संगणमताने पल्लवी गुरव यांच्या शेतातील नांगरणी अडवून पल्लवी यांसह त्यांचे पती, मुलास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पल्लवी गुरव यांनी दि. 20 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 341, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी: व्यंकट महादेव इंगळे, रा. कनगरा, ता. उस्मानाबाद यांना दि. 07 मे रोजी 19.30 वा. सु. कनगरा शेत शिवारात शेत रस्त्याने रहदारीच्या कारणावरुन नातेवाईक- विशाल विठ्ठल इंगळे यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या व्यंकट इंगळे यांनी दि. 20 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत अभिमन्यु घुले, रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद हे त्यांची पत्नी- अनिता यांसह दि. 17 मे रोजी 17.30 वा. सु. समुद्रवाणी येथील आपल्या शेतात होते. यावेळी शेतजमीनीच्या वादावरुन गावकरी- 1)मधुकर गोमदे 2)कमलाकर गोमदे 3)बालाजी गोमदे 4)सुहास गोमदे 5)मंगज गोगदे 6)प्रतिक घुले 7)कार्तीक घुले 8)कनिषा घुले यांसह अन्य 2 अनोळखी व्यक्ती यांनी नमुद घुले पती- पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुकक्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनिता घुले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 144, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.