मुरूम, उस्मानाबाद, कुन्हाळी येथे हाणामारी 

 

मुरुम : आनंदनगर, मुरुम येथील विठ्ठल कांबळे, गोळ्याप्पा कांबळे, अजित कांबळे यांचे दि. 12 जुलै रोजी 19.30 वा. सु. राहत्या गल्लीत पप्पु बस्वराज कांबळे यांच्याशी भांडण चालू होते. यावेळी गल्लीतीलच- बाळु लक्ष्मण गायकवाड यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता विठ्ठल, गोळ्याप्पा व अजित या तीघांनी बाळु यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बाळु गायकवाड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  - सांजा रोड, उस्मानाबाद येथील नाना अशोक शेवाळे यांचा किसन तुकाराम काळे यांचा जावया सोबत पुर्वीचा वाद आहे. दि. 13 जुलै रोजी नाना शेवाळे हे किसन काळे यांची मुलगी- महानंदा व तीचे पती या दोघांना शिवीगाळ करत होते. यावेळी किसन काळे व त्यांची पत्नी हे दोघे तो वाद सोडवण्यास गेले असता नाना शेवाळे यांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या किसन काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा : कुन्हाळी, ता. उमरगा येथील कपिल सुभाष बिराजदार यांसह त्यांचे आई- वडील व भाऊ- किशोर यांना भाऊबंद - रवी, सारीका, निर्मला, अरविंद, महादेवी, राहुल आणि रुक्मिन लव्हरे अशा सात जणांनी शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन दि. 09 जुलै रोजी 09.30 वा. सु. गावातील मारुती मंदीरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या कपिल बिराजदार यांनी दि. 13 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

महिलेवर अत्याचार 
 
उस्मानाबाद  - जिल्ह्यातील एका गावातील एक 30 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 13 जुलै रोजी आपल्या राहत्या घरात झोपली असतांना रात्री 02.00 वा. सु. एका अनोळखी पुरुषाने घराचा दरवाजा ठोठावला. यावेळी त्या महिलेने दार उघडले असता त्या पुरुषाने बळजबरीने घरात शिरुन त्या महिलेवर लैंगीक अत्याचार करुन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 452, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.