माणकेश्वर,मंगरुळ,दुधनाळ,तुगाव तांडा येथे हाणामारी 

 

परंडा: बापु मछिंद्र अंधारे, रा. माणकेश्वर, ता. भुम हे दि. 21.05.2021 रोजी 21.30 वा. सु. जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा- माणकेश्वर समोर थांबले होते. यावेळी गावकरी- शुक्राचार्य रजीचंद्र घोडके यांनी तेथे येउन बापु अंधारे यांना उसणे पैसे मागीतले. यावर बापु अंधारे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता घोडके यांनी त्यांना शिवीगाळ करुन शेजारच्या दुकानासमोरील लाकडी खुर्ची बापु अंधारे यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या बापु अंधारे यांनी दि. 07 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण : बापुराव लिंबाजी गायकवाड, रा. मंगरुळ, ता. कळंब हे दि. 03 जून रोजी 12.00 वा. सु. आपल्या शेतात गेले असता त्यांचा भाऊ- शिवाजी लिंबाजी गायकवाड हे सामाईक बांधावरील शेत सीमेवरील निशानी दगड काढून टाकत होते. यावेळी बापुराव गायकवाड यांनी त्यांना हटकले असता भाऊ- शिवाजी गायकवाड यांसह पुतण्या- सचिन, सोनबा अशा तीघांनी बापुराव गायकवाड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कायता, कुऱ्हाड, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बापुराव गायकवाड यांनी दि. 07 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: दुधनाळ, ता. उमरगा येथील बिराजदार कुटूंबातील पंचाप्पा, शरद, अजित, संदिप, दामाजी अशा पाच जणांनी शेत मोजणीच्या कारणावरुन दि. 07 जून रोजी 10.00 वा. सु. दुधनाळ शिवारात नातेवाईक- माधव बिराजदार यांसह त्यांची पत्नी- सागरबाई व मुलास शिवीगाळ करुन हंटरने, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सागरबाई बिराजदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मुरुम: भास्कर राठोड, रा. तुगाव तांडा, ता. उमरगा हे दि. 06 जून रोजी 14.30 वा. सु. त्यांची पत्नी- सिताबाई यांसह घरी होते. यावेळी तांड्यावरील- राजेंद्र वालचंद राठोड व सुशीला राजू राठोड या दोघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कुरापतीवरुन व भुखंड वाटणीच्या कारणावरुन नमूद दोघ पती- पत्नींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सिताबाई राठोड यांनी दि. 07 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.