खुदावाडी,क्राक्रंबा,विजोरा येथे हाणामारी 

 

नळदुर्ग: नागेश बोगरगे रा.खुदावाडी हे दि.24 जुन रोजी  07.30  वा वडील दिगंबर यांसह घरासमोर उभे होते. या वेळी भाउबंद संजय, अजय या पिता  पुत्रांसह  अजय ची आई हिराबाई या तिघांनी कोरोना रुग्न घरात असल्याच्या वादातुन नागेश व पिता दिगंबर यांना  शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटेने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नागेश यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापूर : क्राक्रंबा येथील  निव्रत्ती दासा साबळे व दगडु दासा साबळे  या दोघा भावांच्या कुटुंबात  दि 25 जुन रोजी 13.30 वा शेतीविषयक कामातुन वाद झाला. यात दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधी गटास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कु-हाडीच्या दांडयाने मारहान करुन खुनाची धमकी दिली अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी  दि. 26 जून रोजी परस्पर विरोधी दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504,506, 143,147, अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 वाशी : ॲडव्होकेट अजितकुमार पाटील हे दिनांक 25 जुन रोजी विजोरा ग्रामपंचायत बैठकीस हजर होते. यावेळी  अनावश्यक लोकांनी बैठकीस हजर राहण्यास त्यांनी विरोध केल्याने गावकरी 1) महादेव रामलाल क्षत्रीय 2) गणेश अंगद खोसे 3) अनिल जगन्नाथ खोसे यांनी अजितकुमार  यांना शिवीगाळ करुन, खुनाची धमकी देउन धारदार पात्याने व खुर्चीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अजितकुमार यांनी दि.26 जुन रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.