कनकवाडी,नान्नजवाडी,टाकळी, जेवळी येथे हाणामारी 

 

येरमाळा: दिनांक  18.06.2021 रोजी 21.30 वा कनकवाडी येथे दशरथ रामभाउ कुंभार हे  शेतातील कामावरुन घरी येत असातांना राजेंद्र, गोटु  धालगडे व विनायक धालगडे यांना तुमचा कुत्रा भुंकत आहे त्याला आवरा असे सांगितले असता तु आम्हांला काय म्हणालास असे म्हणुन काठीने मारुन जखमी केले व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. दिनांक 07.07.2021 रोजी  दशरथ कुंभार यांनी दिले प्रथम खबरे भादसं कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आलेला आहे.

 
भूम :  नान्नजवाडी  येथील श्रीमंत अच्युत माने व भरत आश्रुबा भसाड या दोन्ही कुंटुंबीयांचा  दिनांक  07.07.2021 रोजी 08.00 वा नान्नजवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर  वाद झाला. यात दोन्ही गटांनी    परस्पर विरोधी गटांतील स्त्री-पुरुषांना शिवीगाळ करुन व ठार मारण्याची धमकी देवुन काठी व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले.  अशा मजकुराच्या दोन  प्रथम खबरे भादसं कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये  दोन गुन्हे  नोदंविण्यात आले आहेत.

 
बेंबळी: टाकळी (बेंबळी ) येथील जलील पठाण हे दिनांक 04 जुलै रोजी  आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी जुना वाद उकरुन काढुन सारोळा येथील शौकत, खाजा, सर्फराज, फिरोज यांसह गावकरी जमील व सोहेल पठाण अशा  06 पुरुषांनी जलील यांना लाथा बुक्यांनी मारहाण करुन, शिवीगाळ  करुन ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या जलील  यांनी दिलेल्या प्रथम खबरे भादसं कलम 323, 143, 147,149, 504, 506 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आलेला आहे.

 
 लोहारा
: जेवळी (द)येथील मनोज मुखे यांना गावकरी किशोर, सुरज, जिवन व जगु तोरकडे यांनी दिनांक 04 जुलै रोजी पुर्वीच्या वादातुन लाथा बुक्यांनी मारहाण करुन, जातीवाचक शिवीगाळ  करुन ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या मनोज मुखे यांनी दिलेल्या प्रथम खबरे भादसं कलम 323,504, 506 सह  अ.जा.अ.ज. कायदया अंतर्गत गुन्हा नोदंविण्यात आला आहे.

दोन ठिकाणी चोरी 

 नळदुर्ग: साखर कारखाना परिसरात राहणा-या विमल राजपुत यांच्या बंद घराचे कुलुप अज्ञाताने दिनांक 05 ते 07 जुलै दरम्यान तोडुन घरातील 16 ग्रॅम सुवर्ण दागिने, 17 ग्रॅम चांदी व शेजारी राहणारे चंद्रकांत बुटटे यांची घराबाहेर ठेवलेली  मोटारसायकल एम एच 05 डीजी 1871 चोरुन नेली. यावरुन  भा.दं.सं. कलम- 454, 380  अंतर्गत गुन्हा नोंदवला  आहे.

 
 तुळजापूर : तुळजापूर येथील कन्या शाळा परिसरात राहणा-या राजे्रद जाधव व जयाजी देवबुडे या दोघांच्या बंद  घराचे  कुलुप  अज्ञाताने दिनांक  06 जुलै  रोजी  10.00 ते 16.00 दरम्यान तोडुन  दोन्ही घरांतील 97 ग्रॅम सुवर्ण दागिने व  रोख रक्कम  2,10,700 चोरुन नेली.  यावरुन  भा.दं.सं. कलम- 454, 380  अंतर्गत गुन्हा नोंदवला  आहे.