घाटपिंप्री,सावरगाव,सोनारवाडी येथे हाणामारी
वाशी : समाधान सखाराम गायकवाड, रा. घाटपिंप्री, ता. वाशी यांनी बचत गटाकडून कर्जाने घेतलेले पैसे दादा विष्णु गायकवाड, रा. घाटपिंप्री, ता. वाशी यांनी दि. 06 ऑगस्ट रोजी मागीतले असता समाधान यांसह बापु जाधव, जिवन गायकवाड अशा तीघांनी दादा गायकवाड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दादा गायकवाड यांनी दि. 07 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : पिकातून मजूर नेल्याचा जाब सावरगाव, ता. तुळजापूर येथील हनुमंत व पृथ्वीराज हनुमंत शिंदे या दोघा पिता- पुत्रांनी दि. 07 ऑगस्ट रोजी 20.00 वा. सु. गावातील मंदीरासमोर ग्रामस्थ- हनुमंत व शिवराम हनुमंत जाधव या पिता- पुत्रांस विचारला. यावर चिडून जाउन जाधव पिता- पुत्रांनी शिंदे पिता- पुत्रांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व कोयता, कुऱ्हाडीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या हनुमंतचे पिता- महादेव शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : म्हशीने शेपटाचा फटका मारल्याच्या वादातून सोनारवाडी, ता. वाशी येथील दयानंद मुंढे व करण घोळवे यांनी दि. 05 ऑगस्ट रोजी 19.00 वा. गावकरी- श्रीमती सुशिला शिंदे यांसह पती- बाळासाहेब, सासरे- शिवाजी यांना त्यांच्या घरासमोर जातीवाचक शिवीगाळ करुन काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या सुशिला शिंदे यांनी दि. 07 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 34 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.