बोरी, कराळी तांडा, तडवळा येथे हाणामारी 

लोहारा, वडगाव ( नळी ) येथे चोरीची घटना 
 

वाशी: बोरी, ता. वाशी येथील शिंदे कुटूंबातील बापु, अनिकेत, संकेत, शोभा, रेश्मा अशा पाच जणांनी पुर्वीच्या भांडणाच्या व आंबे तोडल्याच्या कारणावरुन दि. 03.05.2021 रोजी 07.30 वा. सु. गावकरी- बबन व शेखर बबन शिंदे या पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी खिळ, दगडाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बबन गोरोबा शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: कराळी तांडा, ता. उमरगा येथील कविता चव्हाण या दि.02.05.2021 रोजी 06.00 वा. सु. शेजारी- केशव बद्दु चव्हाण यांच्या घरासमोरील जागेत कचरा टाकत होत्या. यावर केशव चव्हाण यांनी त्यांना कचरा न टाकण्यास बजावले असता कविता चव्हाण यांसह रोहीदास चव्हाण, संजु चव्हाण, मनोहर चव्हाण, मोताबाई चव्हाण, अक्षय चव्हाण, प्रशांत चव्हाण अशा सात जणांनी संगणमताने केशव चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या केशव चव्हाण यांनी 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर: संदीप रघुनाथ जानराव, रा. तडवळा, ता. तुळजापूर हे दि. 03 मे रोजी 12.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावकरी- संजय हनुमंत मस्के यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन संदीप जानराव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संदीप जानराव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


“चोरी.”

 लोहारा: ज्ञानेश्वर मारुती सुर्यवंशी, रा. लोहारा यांनी त्यांचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एडी 0521 सह पंजी हे अवजार दि. 27.04.2021 रोजी 19.00 वा. सु. लोहारा (खु.) गट क्र. 39 / 1 मधील शेतात लावले होते. दसऱ्या दिवशी पहाटे 05.00 वा. सु. लावल्या जागी न आढळल्याने ते अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम: समाधान भरत येळे, रा. वडगाव (नळी), ता. भुम यांनी त्यांची होंडा शाईन बीएस 6 मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 0855 ही दि. 01.05.2021 रोजी 21.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्यांना ठेवल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या समाधान येळे यांनी 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.