भूम आणि धानोरी येथे हाणामारी 

तुळजापुरात गृह अतिक्रमण
 

भूम  :  “कुरणामधून जनावरे बाजूला घे.” असे आबा मनोहर साठे यांनी आलमप्रभु जवळील पडीक कुरणामध्ये दि. 29 जुलै रोजी 17.30 वा. सु. ग्रामस्थ- अमोल हरीभाऊ साठे यांना सांगीतले. यावर चिडून जाउन अमोल यांनी आबा यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आबा साठे यांनी दि. 02 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : तानाजी गायकवाड, रा. धानोरा (द.), ता. लोहारा  हे दि. 30 जुलै रोजी आपल्या गावात होते. यावेळी ग्रामपंचायती मार्फतच्या विकास कामांत अडथळा आणन्याच्या वादातून गावकरी- योगेश व सुधाकर पाटील या पिता- पुत्रांसह मळगीवाडी ग्रामस्थ- बलभीम, ज्ञानेश्वर, प्रेमनाथ येवते या तीघा बंधुंसह त्यांची मुले- उमेश, गणेश व अमर अशा आठ जणांनी तानाजी यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


तुळजापुरात गृह अतिक्रमण

तुळजापूर  : तुळजापूर येथील आरण्य मठाच्या कुंपनाचा, कार्यालयाचा व मंदीराचा दरवाजाचे कुलूप गावकरी- कुलदिप व रत्नदीप अमृतराव या दोघा बंधुंसह विजय घोडके, राजेंद्र गंधोरे यांनी दि. 31 जुलै रोजी 11.00 वा. तोडून आत प्रवेश केला. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर खोले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 149, 453 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.