मानवी जिवीतास, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद -  मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे करुन किंवा कोविड- 19 चे मनाई आदेश झुगारुन दुकान व्यवसायासाठी चालू ठेवून भा.दं.सं. कलम-  283, , 188, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 4 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे 4 गुन्हे उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी 26 मार्च रोजी दाखल केले.

(1) समाधान झुंबर कांबळे, रा. जवळगा (मे.), ता. तुळजापूर व सचिन आंबादास केंचे, रा. तुळजापूर या दोघांनी अनुक्रमे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एफ 1256 व ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 09 एक्यु 9308 हे तुळजापूर येथील जुने बसस्थानक येथील रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) आरीफ इमाम शेख, रा. लोहारा (बु.), ता. लोहारा यांनी ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एफ 1327 हा लोहारा बसस्थानक समोर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर लोकसेवकाने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन उस्मानाबाद येथील सोहेल इलाइस कुरेशी यांनी रात्री 07.15 वा. सु. उस्मानाबाद शहरातील आपले चिकन दुकान व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

 
शेती साहित्य व जनावरांच्या चाऱ्यास आग लावून नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

शिराढोन: नायगाव येथील व्यंकट रामभाउ गोरे, सुनील व्यंकट मोरे, विजय व्यंकट मोरे, पांडुरंग केरबा मोरे या चौघांनी 25- 26 मार्च दरम्यानच्या रात्री नायगाव गट क्र. 519 व 499 मधील शेत घरास व पत्रा शेडला आग लावून शेती उपयोगी साहित्य, धान्य, जनावरांचा चारा इत्यादी जाळून अंदाजे 12,00,000 ₹ चे नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या विश्वनाथ शंकर मस्के, रा. मुरुड, ता. लातूर यांनी 26 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.