उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगिक छळ ,अपहरण,चोरी आदी गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद  : एका गावातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 26 जुलै रोजी 20.00 वा. सु. मैत्रीणीस पुस्तक देउन परत घरी येत असतांना गावातीलच तीन तरुणांनी अंधाराचा फायदा घेउन तीस निर्मनुष्य ठिकाणी नेउन तीच्यावर आळीपाळीने लैंगीक अत्याचार केले. तसेच घडला प्रकार कोणास सांगीतल्यास तीला ठार मारण्याची धमकी दिली. यावर त्या मुलीच्या कुटूंबीयांनी नमूद तरुणांच्या घरी जाउन जाब विचारला असता त्या तरुणांसह त्यांच्या कुटूंबीयांनी मुलीच्या कुटूंबीयास शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल व दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 326, 324, 323, 504, 506, 34 सह पोक्सो कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद -  “दळण घेउन येते.” असे कुटूंबीयांस सांगुण एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 25 जुलै रोजी 15.00 वा. सु. घरा बाहेर पडली. ती घरी परत न आल्याने तीच्या कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता गावातीलच एका तरुणाने तीला लग्नाचे आमिष दाखवून तीचे अपहरन केले असल्याचे कुटूंबीयांस समजले. यावरुन अपहृत मुलीच्या पित्याने दि. 27 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

चोरी

मुरुम  : वसीमअक्रम अफसर मुल्ला, रा. केसरजवळगा, ता. उमरगा यांच्या गावातील किराणा दुकानाचे कुलूप दि. 26- 27 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून दुकानातील 8,885 ₹ किंमतीचे किराणा साहित्य चोरुन नेले अशा मजकुराच्या वसीमअक्रम मुल्ला यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.