उस्मानाबाद जिल्ह्यात विनयभंग, मारहाण, अपघात आदी गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद - जिल्ह्यातील एक 33 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) 25 एप्रील रोजी 20.00 वा. सु. राहत्या घरी असतांना गावातीलच एका पुरुषाने पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन त्या महिलेस झोंबाझोंबी करुन तीचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करुन तीच्यासह तीच्या कुटूंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 354, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

 उस्मानाबाद -  मयुर पन्नालाल शर्मा, वय 28 वर्षे व नरेश नंदकुमार धारुरकर, वय 32 वर्षे, दोघे रा. उस्मानाबाद हे दोघे 18 एप्रील रोजी 22.00 वा. सु. उस्मानाबाद येथील ग्रीनलॅन्ड शाळेजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 4108 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 4985 ही चुकीच्या दिशेने, निष्काळजीपणे चालवून मयुर शर्मा चालवत असलेल्या मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात मयुर शर्मा सह पाठीमागील- नरेश धारुरकर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयुरची आई- ममता पन्नालाल शर्मा यांनी 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण: चालक- बालाजी शहाजी कुंडकर,ख्‍ रा. बोरगांव (बु.), ता. कळंब यांनी 21 एप्रील रोजी 21.30 वा. सु. गोविंदपुर फाटा येथील रस्त्यावर इंडीका कार क्र. एम.एच. 44 बी 2863 ही निष्काळजीपणे चालवून रस्त्याने पायी जाणारे गावकरी- जयचंद देवीदास हजारे, वय 35 यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या बोरगांव (बु.) चे रहिवासी- बाळासाहेब पंढरी खांडेकर यांनी 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण 

 वाशी: पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन पारधी वस्ती, गोलेगाव, ता. वाशी येथील 1)सागर काळे 2)शहाजी काळे 3)आशाबाई काळे 4)पुजाबाई काळे या सर्वांनी 23 एप्रील रोजी 17.30 वा. सु. वस्तीवर गावकरी- भारत चंदु काळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भारत काळे यांनी 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तामलवाडी: काटी, ता. तुळजापूर येथील 1)विशाल काळे 2)आबा काळे 3)किरण काळे 4)लक्ष्मण काळे या सर्वांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन 26 एप्रील रोजी 10.00 वा. सु. काटी गावातील सभागृहाजवळ गावकरी- कृष्णाथ झुंबर जाधव यांसह त्यांचा मुलगा- रोहित यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या कृष्णाथ जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.