उमरग्यात मनाई आदेश झुगारुन हॉटेल, दुकान चालू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारीकेलेल्या विविध मनाई आदेशांचे उल्लंघन करुन 1)संजय मनोहरराव रुद्रवार 2)मोसीन मुस्तफा हानुरे, दोघे रा. उमरगा या दोघांनी दि. 03 जून रोजी 10.30 ते 11.00 वा. दरम्यान उमरगा येथील अनुक्रमे ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ व ‘सिटी मोबाईल शॉपी’ ही दुकाने व्यवसायास चालू ठेवली असल्याचे उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. तर 3)जिलानी मेहबुबखॉ पठाण, रा. परंडा यांनी याच दिवशी परंडा येथील आपले ‘मिलन हॉटेल’ व्यवसायास चालू ठेवले असल्याचे परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

            अशा प्रकारे नमूद तीघांनी जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश डावलून व कोविड- 19 संसर्गाच्या शक्यतेची निष्काळजीपणाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

पोलीस नाकाबंदी दरम्यान 485 कारवायांत 1,05,700 ₹ ‘तडजोड शुल्क वसुल

 कोविड- 19 लॉकडाऊन काळातही अनेक लोक गौण कारणास्तव, विनाकारण रस्त्याने वाहने घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा, जरब बसावी या उद्देशाने महत्वाच्या रस्त्यांवर सकाळी 08.00 ते 20.00 वा. दरम्यान पोलीस नाकाबंदी केली जात असुन मोटार वाहन कायदा- नियम व कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान दि. 03 जून रोजी सर्व पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखा यांनी एकुण 485 कारवाया केल्या असुन त्यातून 1,05,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ नियम भंग करणाऱ्यांकडून वसुल केले आहे.

 ब्रेक द चेन: दि. 03.06.2021 रोजी 411 पोलीस कारवायांत 86,700/-रु. दंड वसूल 

उस्मानाबाद -  लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 03.06.2021 रोजी खालील तीन प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 1 कारवाईत- 1,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 8 कारवायांत- 4,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 402 कारवायांत 81,700/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.