कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल

 

नळदुर्ग : कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन  समीर वस्सी बाडेवाले, रा.नळदुर्ग यांनी  त्यांचे समीर मोबाईल  शॉपी  हे दुकान दिनांक  10 जुलै रोजी व्यवसायास चालु ठेवुन नमुद जारी आदेशाचे उल्लंघन केले आहे.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 , 270 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला  आहे.

 
सार्वजनिक ठिकाणी धोकादायक रित्या अग्नी प्रज्वलीत केले वरुन एकावर गुन्हा दाखल

 उस्मानाबाद  -   रामहारी भुजंग तांबे, रा.सांजा, उस्मानाबाद यांनी दिनांक 10 जुलै रोजी सांजा चौक येथे  हातगाडीवर शेगडी  विस्तव पेटवुन त्याची व्यवस्थीत निगा न राखता  धोकादायकरित्या अग्नी प्रज्वलीत केला असल्याचे आनंदनगर  पोठाच्या पथकास आढळले वरुन भादसं कलम 285 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन ठिकाणी हाणामारी 

 
तुळजापूर :  पार्टीस न आल्याच्या वादातुन बारुळ येथील बाळासाहेब पाटील व दिलीप सुतार यांनी गावकरी नितीन भोसले यांना दिनांक 09 जुलै रोजी 22.15 वा गावात शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी  व  लोखंडी गजाने  मारहाण केली. अशा मजकुराच्या  प्रथम खबरेवरुन  भादसं कलम 324,34 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आला आहे.

भुम :  मात्रेवाडी येथील श्रीमती कमल माने या दिनांक 10 जुलै रोजी आपल्या घरात असतांना भाउबंद आण्णासाहेब माने यांनी कमल यांच्या घरात घुसुन  शेतातील पाणी वाटपाच्या वादातुन  शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या  प्रथम खबरेवरुन  भादसं कलम 452,504,506 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आला आहे.