तेरा गुन्हयांतील घरफोडी व लुटीच्या मालासह चोरटा अटकेत

 

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून  चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यातील तेरा गुन्हयांतील घरफोडी व लुटीच्या मालासह एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 

गोपनीय खबरेच्या आधारे स्थागुशाच्या  पोनि-गजानन  घाडगे, पोउपनि-माने, भुजबळ, पोना- सय्यद, पोकॉ-जाधवर, मारलापल्ले , आरसेवाड, ढगारे, ठाकुर यांनी  आज दि 06.07.2021 रोजी आरोपी किरण विलास भोसले, रा.सिंदगाव ता.तुळजापूर यास ताब्यात घेतले. 

त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने अन्य सहका-यांसह  जिल्हा भरात नळदुर्ग पो.ठा  हददीत 05 गुन्हे, लोहारा 03 गुन्हे ,तुळजापूर 02 गुन्हे , उमरगा, बेंबळी, आनंदनगर पो.ठा हददीत प्रत्येकी 01 असे एकुण  12 घरफोडी व एक  लुटमारीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पथकाने त्याच्या ताब्यातुन वर नमुद 13 गुन्हयांत चोरी केलेले 160 ग्रॅम सुवर्ण दागिने किंमत 7,52,000 रुपये , 80 ग्रॅम चांदी किंमत 5,200 रुपये व रोख रक्कम 89,000 रुपये असा एकुण  8,46,200 रुपये  किंमतीचा  माल जप्त केला आहे. पोलीस त्याच्या उर्वरीत साथीदारांचा शोध घेत असुन पुढील तपास संबंधीत पोलीस ठाण्यां मार्फत केला जाणार आहे.  

  
घरफोडी व चोरीच्या मालासह चोरटा अटकेत

उस्मानाबाद  -  गोपनीय खबरेच्या आधारे स्थागुशाच्या  पोनि-गजानन  घाडगे  यांच्या  मार्गदर्शनाखाली सहापोनि- निलंगेकर, पोना- लाव्हरे, पोकॉ-सर्जे, सावंत यांचे पथक  उस्मानाबाद जिल्हयात विविध भागात चो-या करणा-या आरोपींची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढत होते. या आधारे  पथकाने दि 06.07.2021 रोजी खिरणी मळा, उस्मानाबाद येथील फारुख रहमान शेख यास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात आनंदनगर पो.ठा गु र क्रमांक 175/2021 मधील चोरीचा स्मार्ट फोन आढळल्याने त्यास अटक करुन आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

        

कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन प्रकरणी चौघांना आर्थिक दंडाची शिक्षा

 तामलवाडी पोलीस ठाणे येथील पथकाने दिनांक 07 जुलै रोजी  केले कारवाईत गोपाळ सोमनाथ सुरवसे, पांडुरंग उर्फ अमोल दत्तात्रय घोटकर,राजेद्र अंबादास वरदेकर सर्व रा. तामलवाडी व त्रंबक किसन चौगुले,रा. सोलापुर यांनी कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन करुन, मास्क न वापरता गर्दी जमवुन आपल्या  दुकानात  व्यवसाय करुन  भादसं कलम  269  चे  उल्लंघन केल्याचे आढळले.त्याबददल चौघांना प्रत्येकी  500 रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी आज रोजी सुनावली आहे.