धाराशिव जिल्हयात नव्याने स्त्री,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना मंजूरी  

लवकरच बांधकामास होणार सुरुवात
 

धाराशिव -  सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे व जिल्हयातील नागरीकांच्या आरोग्य सेवेची निकड/गरज लक्षात घेवून उस्मानाबाद जिल्हयात खालील प्रमाणे स्त्री,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना मंजूरी मिळालेली आहे.

       परंडा येथे १०० खाटांचे नविन स्त्री रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण ४३८६.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये १०९६.५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जागा निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे. परंडा येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण ४३८६.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये १०९६.५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जागा निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे.

भूम येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण २४५३.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये ६१३.२५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जागा निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे. वाशी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण २४५३.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये ६१३.२५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची कार्यवाही चालू आहे.वालवड ता.भूम येथे नविन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयास मंजूरी मिळाली असून एकूण १७७५.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आले.सन २०२३-२४ मध्ये ४४३.७५ लक्ष इतक्या निधीस मंजूरी  मिळाली असून जुनी इमारत पाडण्यासाठीची कार्यवाही चालू आहे.