उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार अवैध मद्य विरोधी कारवाई

 

उस्मानाबाद -  जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरे वरुन  स्थागुशाच्या पथकाने 07 एप्रील रोजी शहरात दोन ठिकाणी छापे टाकले. पहिल्या छाप्यात सुनिल नारकर हा सोमनाथ चपणे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर येथील पत्राशेडच्या बाजुस कल्याण मटका जुगार खेळताना 6,710 ₹ रकमेसह आढळले. तर दुस-या छाप्यात जमीर तांबोळी हे सोमनाथ चपणे यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकासमोर कल्याण मटका जुगार खेळताना  8,225 ₹ रकमेसह आढळले. या वरुन दोघांविरुध्द महाराष्ट् जुगार प्रतिबंधक कायदा  अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 भुम : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्थागुशाच्या पथकाने 07 एप्रील रोजी पाथ्रुड – ईट रस्त्यावरील दुधोडी फाटा येथे दोन छापे टाकले. पहिल्या छाप्यात श्रीकांत बावकर व रोहन पौळ रा. पाथ्रुड, हे दोघे अवैध विक्रीच्या उद्देशाने एका खोक्यातुन देशी दारुच्या 180 मि.ली.च्या 48 बाटल्या एम एच 25 ए क्यु 7228 या मोटार सायकलवरुन वाहुन नेत असतांना तर दुस-या छाप्यात दत्तात्रय कराळे व शिवशंकर कराळे दोघे रा. भुम हे अवैध विक्रीच्या उद्देशाने तिन खोक्यातुन देशी दारुच्या 180 मि.ली.च्या 144 बाटल्या एम एच 14ई झेड 4513 या मोटार सायकलवरुन वाहुन नेत असतांना स्थागुशाच्या पथकास आढळले.

 उस्मानाबाद ग्रामीण : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्थागुशाच्या पथकाने 07 एप्रील रोजी येडशी- जाहगिरदारवाडी रस्त्यावर छापा टाकला. यावेळी  सचिन तुकाराम राठोड रा. जाहगिरदारवाडी  हे ॲपे प्रवाशी रिक्षातुन पाच खोक्यांत देशी दारुच्या 240  बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने वाहुन नेत असतांना स्थागुशाच्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी नमुद मद्य व वाहने जप्त करुन संबंधीत पोलीस ठाण्यांत 3 गुन्हे महाराष्ट्र मद्य निषेध कायदयांतर्गत नोंदवले आहेत.