उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई

 

शिरोढोण : जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरे वरुन  शिराढोण पोलीसांनी 13 एप्रील रोजी घारगाव शिवारात छापा टाकला. यात वसंत जाधव, सलीम सय्यद, रा. घारगाव, धोंडीबा श्रीरामे, राहुल पानढवळे, जलील सय्यद रा. रांजणी, हे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करुन आदीत्य बारचे पाठीमागे तिरट जुगार खेळताना  8,300 ₹ रकमेसह आढळले. या वरुन महाराष्ट् जुगार प्रतिबंधक कायदा  सह भा. दं. वि. अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

शिराढोण : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोण पोलीसांनी  13 एप्रील रोजी 20.30 वा. शिराढोण येथे श्रावणी बारचे समोर, ता. कळंब  येथे छापा टाकला असता ब्रम्हानंद, शेख नय्यर, महमद, समदर पटेल, सर्व रा. अंबाजोगाई, सचिन माकोडे, रा. शिराढोण, हे अवैध विक्रीच्या उद्देशाने  विदेर्शी दारुच्या  106 बाटल्या चार चाकी वाहनामध्ये घेउन जात असतांना आढळला.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद ग्रामीण : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्थागुशा च्या पथकाने 12 एप्रील रोजी 21.30 वा. कौडगाव शिवारातील शिवराय ढाबा समोर छापा टाकला असता, कुमार तानवडे रा. कौडगाव व एक अज्ञात यांनी अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 740 बाटल्या एका ट्रक्टर  मधुन वाहतुक करीत  असतांना आढळले.

 मारहाण

 मुरुम: अमजद शिकलकर, रा. मुरुम ता. उमरगा  हे 12 एप्रिल रोजी 21.45 वा.  शहरातील ताश्कंद कापडाचे दुकानसमोर थांबले होते. यावेळी भावकीतील मताब,  रियाज, आजिम, शेरु शिकलकर रा. मुरुम, यांनी जुन्या वादावरुन अजमद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. चाकुने व हंटरने मारुन जखमी केले.  तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अमजद यांनी दि. 13 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 506, 34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.