तेर चोरी प्रकरणी लॅपटॉपसह आरोपी अटकेत

 

ढोकी: तेर, ता. उस्मानाबाद येथील लॅपटॉप- मोबाईल फोन दुरुस्ती दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 04 व 05.01.2021 दरम्यानच्या रात्री तोडून आतील लेनोवो कंपनीचे 2 लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल फोन व 22,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला होता. यावरुन ढोकी पो.ठा. येथे गु.र.क्र. 04 / 2021 भा.दं.सं. कलम- 461, 380 प्रमाणे दाखल आहे.

            गुन्हा तपासादरम्यान उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्याच्या पोनि- श्रीमती अर्चना पाटील यांच्या पथकाने तांत्रीक तपास करुन माहिती पुरवली. या प्राप्त माहितीच्या आधारे व खबऱ्यामार्फत मिळालेल्या बातमी आधारे ढोकी पो.ठा. चे प्रभारी अधिकारी सपोनि- श्री. सुरेश बनसोडे, पोउपनि- श्री बुध्देवार, पोहेकॉ- गवळी यांच्या पथकाने मछिंद्र दत्तात्रय श्रीरसागर, वय 25 वर्षे, रा. वाल्मिकीनगर, लातूर यास काल दि. 11 ऑगस्ट रोजी ताब्यात घेउन त्याच्याकडून गुन्ह्यातील नमूद चोरीच्या मालापैकी 2 लॅपटॉप जप्त केले असून उर्वरीत तपास चालू आहे.  (सोबत छायाचित्र जोडले आहे.)

दोन  वर्षांपासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत

उस्मानाबाद  -  नळदुर्ग पो.ठा. गु.र.क्र. 260 / 2019 भा.दं.सं. कलम- 457, 380 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- सुरेश उध्दव चव्हाण, वय 50 वर्षे, रा. राजेशनगर पारधी पिढी, ढोकी याचा पोलीस शोध घेत होते. तपासादरम्यान तो गावी आल्याची गोपनीय खबरेच्या आधारे स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, कोळी, होळकर, माने यांच्या पथकाने काल दि. 11 ऑगस्ट रोजी ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस नळदुर्ग पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

दोन गुन्ह्यातील आरोपींस आर्थिक दंडाची शिक्षा

परंडा : कोविड- 19 संसर्ग होण्याची निष्काळजीपनाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 269 चे परंडा पो.ठा. हद्दीत उल्लंघन केल्याने भगवान दिलीप शेंडगे व साहील दादासाब आलन यांना प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा दि. 11 ऑगस्ट रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी सुनावली आहे.