आंबीत चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी ताब्यात

 

आंबी: सचिन किसन भांडवलकर, रा. वाटेफळ, ता. परंडा यांची हिरो एचएफ डिलक्स एम.एच. 12 एसएस 4285 ही दि. 28.04.2021 रोजीच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावर आंबी पो.ठा. येथे गु.र.क्र. 66 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

            गुन्हा तपासा दरम्यान आंबी पो.ठा. चे सपोनि- श्री आशिष खांडेकर, पोहेकॉ- गजानन मुळे, पोना- सिध्देश्वर शिंदे, पोकॉ- राहुल गायकवाड, सतीश राऊत यांच्या पथकास खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे हिंगणगाव (खु.), ता. परंडा येथील रुपचंद मधुकर शिंदे, वय 23 वर्षे यास दि. 31.05.2021 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाया

मुरुम: 1)श्रीनिवास शंकरराव कणकधर, रा. सालेगाव 2)दत्तात्रय श्रीपती लाळे, रा. कोराळ हे दोघे दि. 30 मे रोजी कोराळ शिवारातील राम माडजे यांच्या पत्रा शेडमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900 ₹) बाळगलेले असलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

 
 उमरगा: अनिल राजकुमार तेलंग, रा. बस्वकल्याण, राज्य- कर्नाटक हे दि. 30 मे रोजी कोळसुर, ता. उमरगा शिवारातील एका पत्रा शेडसमोर 20 लि. शिंदी (किं.अं. 1,700 ₹) अवैधपणे बाळगलेले असलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.