सात वर्षापासून फरार असलेला आरोपी अटकेत
उस्मानाबाद - तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 83 / 2014 भा.दं.सं. कलम- 379 सह मोका कायदा कलम- 3 या गुन्ह्यातील आरोपी- भाऊसाहेब मधुकर पवार उर्फ टुरम्या, वय 48 वर्षे, रा. वडशिवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर याचा पोलीस गेल्या 7 वर्षापासून शोध घेत होते. तो पोलीसांना हुलकावनी देत असल्याने त्याचा निश्चित ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्याच्या तपासावर होते.
तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोउपनि- पांडुरंग माने, श्री. सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, शेळके, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- बबन जाधवर, सर्जे, अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, माने यांच्या पथकास भाऊसाहेब पवार हा त्याच्या गावी परतल्याची गोपनीय खबर मिळाल्याने पथकाने दि. 26 जुलै रोजी त्याच्या घरास वेढा घालून त्यास घरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव तामलवाडी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
तुळजापूर - तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे गौण खनिजाचे (मुरुम) अवैध उत्खनन होत असल्याच्या खबरेवरुन महसुल विभागाच्या पथकाने दि. 25 जुलै रोजी छापा टाकला. दरम्यान ढेकरी ग्रामस्थ- 1)आनंद बिभिषन कदम 2)बिभिषन कदम हे दोघे अवैधरित्या उत्खनन करुन मुरुम चोरुन नेत असतांना आढळले. यावर पथकाने त्यांच्यावर कारवाई सुरु केली असता नमूद दोघांनी पथकाशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन “तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेन.” अशी धमकी देउन पथकाच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन ढेकरी सजा तलाठी- राजेश पालमपल्ले यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 379, 504, 506, 34 सह महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम कलम- 48 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.